रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 30, 2014 00:30 IST2014-11-30T00:29:41+5:302014-11-30T00:30:37+5:30
रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल

रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर गुरुवारी रास्ता रोको करणाऱ्या अज्ञात ५० ते ६० इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर येथे चेंबरमध्ये गुदमरून मृत झालेल्या कामगारांचे नातेवाईक व सहकाऱ्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केले होते़ बुधवारी दुपारी सोमेश्वर गेटजवळ चेंबरमध्ये साफसफाई करताना दोन कर्मचाऱ्यांसह एका जेसीबी आॅपरेटरचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आर्थिक भरपाईसह मृतांच्या वारसांना नोकरी द्यावी या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. तसेच सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्तांनी लेखी आश्वासन द्यावे, या मागणीसाठी मृतांच्या नातेवाइकांसह इतरांनी जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सुमारे ६० संशयितांविरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)