अश्लील छायाचित्र प्रकरणी तिघे गजाआड

By Admin | Updated: February 28, 2017 00:33 IST2017-02-28T00:32:48+5:302017-02-28T00:33:08+5:30

सटाणा : येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीबाबत सोशल मीडियाच्या ग्रुपवर अश्लील पोस्ट टाकल्याचा प्रकार उघडकीस आला

In the case of pornographic photographs, | अश्लील छायाचित्र प्रकरणी तिघे गजाआड

अश्लील छायाचित्र प्रकरणी तिघे गजाआड


सटाणा : येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीबाबत सोशल मीडियाच्या ग्रुपवर अश्लील पोस्ट टाकल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पीडित विद्यार्थिनीने सटाणा पोलिसांत तक्र ार केली आहे. तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदनामी नको म्हणून विद्यार्थिनीचे वडील आणि काका त्या विद्यार्थ्याला समज देण्यास गेले असता विद्यार्थ्याच्या बापानेच टवाळखोर मुलाची बाजू घेत विद्यार्थिनीच्या वडील व काकांना दमबाजी केली. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे व त्याच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कृत्याचे समर्थन केल्याने मुलाचे वडील शकील रज्जाक कुरेशी (५०), काका शरीफ रज्जाक कुरेशी (४०), आरिफ रज्जाक कुरेशी (३६) सर्व राहणार. सुभाष रोड नंबर २, सटाणा यांना अटक केली आहे.
(वार्ताहर)
.

Web Title: In the case of pornographic photographs,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.