गैरव्यवहार प्रकरणी एकाच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: October 13, 2015 23:53 IST2015-10-13T23:51:25+5:302015-10-13T23:53:02+5:30
गैरव्यवहार प्रकरणी एकाच्या कोठडीत वाढ

गैरव्यवहार प्रकरणी एकाच्या कोठडीत वाढ
इगतपुरी : पुण्यातील बांधकाम व्यवसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महादेव केकान याचा जामीन अर्ज न्यायलायाने फेटाळून लावत मंगळवारी पुन्हा तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी केकानच्या नाशिक येथील निवास्थानातून १ लाख रु पयांची रोकड हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली.
इगतपुरीतील महादेव केकान याने पुण्यातील बांधकाम व्यवसायिक तुषार गडाळे यांना स्वस्तात जमीन घेऊन देतो असे सांगत १ कोटी रु पये घेवून फसवणूक केली होती. गडाळे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केकाण याला अटक केली. त्याला १३ आक्टोंबरपर्यंत कोठडी सुनावली होती. त्याला इगतपुरी न्यालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने आणखी 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. (वार्ताहर)