विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 20, 2017 00:50 IST2017-01-20T00:50:44+5:302017-01-20T00:50:56+5:30

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

In the case of Marriage, four accused have been arrested | विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

 निफाड : तालुक्यातील सारोळे खुर्द येथील विवाहिता विद्या संदिप गवंडे हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी पती, सासु, सासरे, नणंद यांचेविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत विवाहितेचा पती व सासऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
निफाड पोलिसांत विवाहितेचे पिता चंद्रकांत भोकनळ रा. तळेगाव (रोही ) ता. चांदवड यांनी तक्र ार दाखल केली असुन मुलगी विद्या हिचा सारोळे येथील सजन गवंडे याचेसोबत २ मे २०१५ रोजी विवाह झाला होता.विवाहानंतर फर्नीचर घेतले नाही म्हणुन तीचा छळ केला जात होता. विद्याचे सासरे सजन यांनी दोन लाखाची मागणी केली असता त्यांना पंचवीस हजाराचा धनादेश दिल्याच्या कारणावरून पती संदिप, सासु शोभा यांनी मारहाण करु न शिविगाळ केली. जेवायला दिले नसल्याची माहिती मुलीने दिल्याचे पित्याने तक्रारित म्हटले आहे. पुर्ण पैसे दिले नाही म्हणुन मारहाण व शिविगाळ केल्याचेही विद्याने फोनव्दारे सांगितले होते. १९ जानेवारी रोजी विहिरीत विद्याचे शव आढळून आले. याबाबत निफाड पोलिसांत संदिप सजन गवंडे, सासरे सजन केदु गवंडे, सासु शोभा सजन गवंडे, नणंद अर्चना पंकज महाले यांच्याविरूध्द निफाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the case of Marriage, four accused have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.