विवाहिता आत्महत्त्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 20, 2017 18:31 IST2017-06-20T18:31:23+5:302017-06-20T18:31:23+5:30
पतीकडून होणार्?या सततच्या शारिरीक व मानिसक त्रासाला कंटाळून पंचवटीतील विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती.

विवाहिता आत्महत्त्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पतीकडून होणार्?या सततच्या शारिरीक व मानिसक त्रासाला कंटाळून पंचवटीतील विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेच्या विडलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पंचवटी पोलिसांनी संशियत प्रशांत रतन जैन (26, रा. सुकेनकर लेन, पंचवटी) यास अटक केली आहे. रविवारी (दि.18) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात हर्षा प्रशांत जैन (25) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे विडल सुरेश सैतवाल (52, रा. रावेर, जि. जळगाव) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हर्षाचे पती प्रशांत विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार प्रशांत हर्षाच्या चारित्र्यावर संशय घेत असे, तसेच स्वयंपाक येत नसल्याची कुरापत काढून त्रास देत. या त्रासाला कंटाळून हर्षाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप सैतवाल यांनी केला आहे.