शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू विक्र ीबाबत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:14 IST

अवैध गावठी दारू विक्रीप्रकरणी बागलाण तालुक्यातील निकवेल येथील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेविरुद्ध सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसटाणा पोलीस : दारू बंदीसाठी सरसावली निकवेलची तरुणाई

डांगसौदाणे : अवैध गावठी दारू विक्रीप्रकरणी बागलाण तालुक्यातील निकवेल येथील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेविरुद्ध सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निकवेल येथील तरुणांनी गावात शंभर टक्के दारूबंदी केली असून, त्यांना ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी साथ दिली. गावात दारू विक्र ी करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा गावातील तरुणांसह महिला व ग्रामस्थांनी दिला होता.गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावातील अवैध गावठी दारू विक्री बंद केली होती. निकवेल येथील आदिवासी वस्तीतील गावठी दारूविक्री करणाºयांवर अचानक धाड टाकून सर्व दारू जप्त करून ती नष्ट केली होती. तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्यही या महिलांनी नष्ट केले आहे. तसेच गावातून मोर्चा काढून दारूबंदीच्या घोषणा या रणरागिणींनी दिल्या होत्या. या महिलांबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ग्रामस्थांनी दारू विक्री करणाºयांना यापुढे गावात दारू विक्री करू नये, अशी तंबी दिली होती. यापुढे दारू विक्री करताना आढळल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायतीकडून देण्यात आला होता. याप्रकरणी हवालदार प्रकाश जाधव, नाईक जयंतसिंग सोळुंके, राहुल शिरसाठ, निवृत्ती भोये, पंकज सोनवणे आदींनी कारवाई केली.यावेळी सरपंच चित्राबाई मोरे, उपसरपंच रामचंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य तात्या पांडू , गुलाब मोरे, गाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश वाघ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र महाजन, पुंजाराम वाघ, पोलीसपाटील विशाल वाघ, आप्पा सोनवणे, संजय सोनवणे, भिका वाघ, अण्णा वाघ, शांताराम मोरे, रामचंद्र मोरे,देवका माळी, भिकूबाई पिंपळसे, अलकाबाई मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.४०० ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदनआदिवासी वस्तीतील शीलाबाई नानाजी अहिरे या महिलेकडून अवैधरीत्या गावठी दारू विक्र ी सुरूच होती. समज देऊनही महिला ऐकत नसल्यामुळे सुमारे ४०० गावकºयांनी सटाणा पोलीस स्टेशन गाठून सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना दिले. यावर पोलीस निरीक्षक देसले यांनी या महिलेस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी