मुलाच्या अपहरण प्रकरणी आमदारासह तीन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 28, 2014 01:14 IST2014-05-28T01:08:04+5:302014-05-28T01:14:41+5:30

संशयितांमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते व नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशींचा समावेश

A case has been registered against three corporators including the MLA in the kidnapping case | मुलाच्या अपहरण प्रकरणी आमदारासह तीन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

मुलाच्या अपहरण प्रकरणी आमदारासह तीन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

संशयितांमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते व नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशींचा समावेश
नाशिक : डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या मुलाचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी एका आमदारासह तीन नगरसेवकांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अपहरणातील संशयितांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक रवि पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, डी़ जी़ सूर्यवंशी यांच्यासह आणखीन सात-आठ जणांचा समावेश आहे़
डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक अर्चना राजेंद्र कोठावदे (३८, रा़ डोंबिवली) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार त्यांचा मुलगा प्रतीक राजेंद्र कोठावदे याचे २६ एप्रिल २०१४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाथर्डी फ ाटा येथून आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक रवि पाटील, नाशिकचे शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, शिवसेनेचे नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशी यांच्यासह सात-आठ जणांनी सफे द रंगाच्या मर्सिडिजमधून अपहरण केले़
प्रतीकचे अपहरण केल्यानंतर त्यास संशयितांनी कल्याण येथील हॉटेल हेरिटेज येथील रूम नंबर २०८ मध्ये एक दिवस डांबून ठेवून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात नेऊन नगरसेविका अर्चना कोठावदे यांचे अपहरण झाल्याची फि र्याद देण्यास भाग पाडले़ अपहृत प्रतीकची परीक्षा तसेच बाहेरगावी गेल्यामुळे फि र्यादीस विलंब झाल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे़

स्थायी निवडणुकीदरम्यानची घटना
सुमारे एक महिन्यापूर्वी डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान नगरसेवक अर्चना कोठावदे गायब झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती़ कोठावदे यांची गायब होण्याची वृत्तेही प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या संख्येने प्रकाशित झाली होती़ दरम्यान, घटनेच्या तब्बल एक महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे राजकीय वाद असल्याची चर्चा आहे़

बोरस्ते, सूर्यवंशींबाबत चर्चेला उधाण
गेल्या काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून महानगरप्रमुख अजय बोरस्ते व शिवसेना नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशी यांची पोलीस उपआयुक्तांनी नोटिसा देऊन चौकशी केली होती़ या चौकशीला काही दिवस होत नाही तोच या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे़

Web Title: A case has been registered against three corporators including the MLA in the kidnapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.