नाशिकरोड परिसरात कार पेटविली
By Admin | Updated: September 13, 2016 01:50 IST2016-09-13T01:49:53+5:302016-09-13T01:50:22+5:30
नाशिकरोड परिसरात कार पेटविली

नाशिकरोड परिसरात कार पेटविली
नाशिकरोड : शहरात काही दिवसांच्या कालावधीनंतर वाहनांची जाळपोळ होण्याचे प्रकार घडतात़ असाच एक प्रकार जयभवानीरोड परिसरात घडला असून, अज्ञात समाजकंटकांनी रविवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास कार पेटवून दिल्याची घटना घडली़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडकेनगर येथील मनाली पार्कमधील रहिवासी राजेंद्र बाबुराव गरुड यांनी आपली फोर्ड फिगो कार (एमएच १५, एफएफ ०३१७) घरासमोर पार्क केली होती़ अज्ञात समाजकंटकांनी या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली़ यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)