फरशी पूल गेला वाहून
By Admin | Updated: August 10, 2016 22:23 IST2016-08-10T22:22:46+5:302016-08-10T22:23:15+5:30
फरशी पूल गेला वाहून

फरशी पूल गेला वाहून
सुरगाणा : तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या देवलदरी ते चापापाडा नदीवरील फरशी पूल पुरात वाहून गेल्यामुळे नागरिकांना पाण्यातून पायी चालत प्रवास करावा लागत आहे.
चापापाडा येथे तीनशे ते साडेतीनशे लोकवस्ती आहे. तासभर अतिवृष्टी झाल्यास नेहमीच इतर गावांशी संपर्क तुटतो. दोन ते अडीच किलो मीटर अंतर नदी ओलांडून रुग्णाला झोळी बांधून देवलदरी येथे रस्त्यावर आणावे लागते. उपचारासाठी गुजरातमध्येही जाता येत नाही. हा पूल तत्काळ सुरू करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य भिका राठोड, गोपाळ सितोडे, चिंतामण बोरसे, मांगीलाल पवार, जमन गावित, राजाराम बोरसे, लक्ष्मण पवार, शिवराम दिवा, सावळीराम वाघमारे आदिंनी केली आहे.