भरधाव वाहनाने तिघांना उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:24 IST2017-10-04T23:24:49+5:302017-10-04T23:24:53+5:30
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या सापगाव फाट्यावर नाशिकहून भरधाव वेगाने येणाºया पिकअप जीपने दुचाकीनजीक उभे असलेल्या तिघांना उडविल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

भरधाव वाहनाने तिघांना उडविले
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या सापगाव फाट्यावर नाशिकहून भरधाव वेगाने येणाºया पिकअप जीपने दुचाकीनजीक उभे असलेल्या तिघांना उडविल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. लक्ष्मण धोंडू गमे (५०, रा. अंबोली) व सोना शिवा गांगुर्डे (६०, रा. ब्राह्मणवाडे) अशी मृतांची नावे आहेत.
मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्र्यंबकेश्वर जवळील सापगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला दुचाकी (क्र. एमएच १५ डीई ५८९५) उभी करून तिघे बोलत उभे होते. दरम्यान नाशिककडून भरधाव आलेल्या पिक अप व्हॅनने (क्र. एमएच ०२ एक्सए ४५७५) तिघांनाही धडक देऊन उडवून दिले. त्यातील लक्ष्मण गमे जागीच ठार झाले, तर सोना गांगुर्डे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. साहेबराव हनुमंता ताठे (३५, रा. अंबोली) हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर पिकअपचालक घटना स्थळावून फरार झाला. अधिक तपास वरिष्ठ पालीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुंखे व हवालदार वझरे करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षसापगाव फाटा हे अपघात स्थळ म्हणून हल्ली ओळखले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे त्वरित दुभाजक बांधावेत तसेच ‘अपघाती जागा, वाहने हळू चालवा’ असा फलक लावावा, अशी सापगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.