वाहनाच्या धडकेने काळवीट ठार
By Admin | Updated: May 21, 2017 00:11 IST2017-05-21T00:11:32+5:302017-05-21T00:11:50+5:30
वाहनाच्या धडकेने काळवीट ठार

वाहनाच्या धडकेने काळवीट ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : नगरसूल-रेंडाळे रस्त्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने काळविटाला धडक दिल्याने काळवीट जागीच ठार झाल्याची घटना घडल्याची माहिती वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण आहिरे यांनी दिली.
वातावरणात उष्मा वाढत असल्याने येवला तालुक्यातील रेंडाळे शिवारात अन्नपाण्याच्या शोधात हरीण आणि काळवीट यांच्यासह वन्यप्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा प्राण्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत. धडक दिल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येते. परंतु कायद्याच्या धाकाने हे वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी हरणांचा जीव जातो.