टपाल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:18+5:302021-09-26T04:16:18+5:30
गणेशवाडी येथील टपाल कार्यालयात दैनंदिन शेकडो खातेदार टपाल संबंधित कामासाठी येत असतात त्यात पेन्शनधारक, तसेच आरडी संबंधित कामासाठी येणाऱ्यांमध्ये ...

टपाल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड
गणेशवाडी येथील टपाल कार्यालयात दैनंदिन शेकडो खातेदार टपाल संबंधित कामासाठी येत असतात त्यात पेन्शनधारक, तसेच आरडी संबंधित कामासाठी येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या असते. कार्यालयात आल्यावर किमान ३० ते ४० नागरिक विविध कामासाठी रांगेत उभे असतात त्यात पैसे काढण्यासाठी व पैसे भरण्यासाठी कधी कधी एकाच रांगेत उभे राहावे लागते. केवळ पासबुक प्रिंट करण्यासाठी, तर अनेक नागरिकांना तासभर रांगेत उभे राहावे लागते. याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला विचारणा केली तर आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे असे सांगतात. या कार्यालयात पोस्टमास्तर महिला अधिकारी असून, त्यांना विचारणा केली तर तर पासबुक प्रिंट करण्यासाठी रांगेतच उभे राहावे लागेल असे सांगतात. पंचवटी टपाल कार्यालयातील या गोंधळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टपाल कार्यालयात तीन कक्ष असून, आमच्याकडे पासबुक प्रिंट खराब होईल तुम्ही त्या काउंटरवर करा आज गर्दी आहे उद्या या असे सांगून पिळवणूक केली जाते, तर रांगेत उभे राहिल्यावर दुपारी जेवणाची सुटी झाली म्हणून थोडावेळ थांबा असे म्हणत अडवणूक केली जात असल्याची तक्रार आहे.