नाशिकला कार्डवाटप

By Admin | Updated: August 31, 2014 00:55 IST2014-08-29T00:42:29+5:302014-08-31T00:55:01+5:30

दीड लाख नागरिक होणार जनधन योजनेचा भाग दिल्लीहून शुभारंभ

Cardwalk to Nashik | नाशिकला कार्डवाटप

नाशिकला कार्डवाटप

,नाशिक : १५ आॅगस्ट रोजी जाहीर केलेल्या पंतप्रधान जनधन योजनेचा शुभारंभ दिल्लीतील विज्ञान केंद्रातून झाला अन् या योजनेअंतर्गत नाशिक जिल्'ातील पुरुष व महिला सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते पासबुक व रूपे कार्डाचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या दिल्ली येथील पंतप्रधान जनधन योजनेचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटनाचा सोहळा अग्रणी बॅँकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्'ातील सर्व प्रमुख बॅँकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे प्रत्यक्ष चित्रणही उपस्थितांना पाहावयास मिळाले. त्यानंतर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात जनधन योजनेचे पासबुक व रूपे कार्डाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Cardwalk to Nashik