घरफोड्यांनी केली सोन्याच्या दागिन्यांसह कारची चोरी
By Admin | Updated: February 16, 2017 17:07 IST2017-02-16T17:07:23+5:302017-02-16T17:07:23+5:30
बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी केलेल्या सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज घरमालकाच्याच कारमध्ये टाकून चोरट्यांनी कारही चोरून नेल्याची घटना अमृतधाम परिसरातील अयोध्यानगरमध्ये घडली आहे़

घरफोड्यांनी केली सोन्याच्या दागिन्यांसह कारची चोरी
नाशिक : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी केलेल्या सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज घरमालकाच्याच कारमध्ये टाकून चोरट्यांनी कारही चोरून नेल्याची घटना अमृतधाम परिसरातील अयोध्यानगरमध्ये घडली आहे़
आनंदराम सोसायटीतील रहिवासी कांतीकुमार कैलास देवरे हे १४ व १५ तारखेला बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल, घरातील गॅस सिलिंडर, कपडे, साड्या असा ऐवज चोरला़ या चोरट्यांना देवरे यांच्या कारची चावी घरात टांगलेली आढळली़ त्यांनी घरातून चोरलेला ऐवज देवरे यांच्याच कारमध्ये टाकून कारही पळवून नेली़
याप्रकरणी देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़