दिंडोरीरोडवरील झाडावर कार आदळून एक ठार
By Admin | Updated: August 27, 2016 00:29 IST2016-08-27T00:29:18+5:302016-08-27T00:29:32+5:30
दिंडोरीरोडवरील झाडावर कार आदळून एक ठार

दिंडोरीरोडवरील झाडावर कार आदळून एक ठार
नाशिक : दिंडोरीरोडवरील हॉटेल राणाजवळ भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि़२५) रात्रीच्या सुमारास घडली़ कारचालकाचे नाव प्रकाश पुंजाजी सानप (२५) असे असून, ते दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रहिवासी आहेत़ या अपघाताची म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश सानप हे रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या स्विफ्ट कारने (एमएच १५ सीटी ३४३३) दिंडोरीरोडने जात होते़ त्यांची कार हॉटेल राणाजवळील झाडावर जाऊन आदळली़ यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून, कारचालक सानप हे जागीच ठार झाले़
या अपघात प्रकरणी अधिक तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे करीत आहेत़ (प्रतिनिधी)