कारची काच फोडून तीन लाख लंपास
By Admin | Updated: September 15, 2015 23:55 IST2015-09-15T23:55:13+5:302015-09-15T23:55:40+5:30
कारची काच फोडून तीन लाख लंपास

कारची काच फोडून तीन लाख लंपास
नाशिक : रस्त्यावर उभ्या केल्या कारच्या दरवाजाची काच फोडून पुढील सीटवर ठेवलेली तीन लाखांची रोकड दुचाकीस्वारांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास गंगापूररोडवर घडली़
गंगापूररोडवरील खतीब डेअरीजवळील सप्तशृंगी अपार्टमेंटमध्ये राहणारे मयुरेश गदाधर अकोलकर यांनी आपली कार गंगापूररोडवर उभी केलेली होती़ दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास सागर स्वीट ते विद्या विकास सर्कल या रस्त्याने जाणाऱ्या सीबीझेड व यामाहा या दोन दुचाकीवरील चौघा संशयितांनी या कारच्या दरवाजाची काच फोडून पुढील सीटवरील रुमालात बांधून ठेवलेली तीन लाखांची रोकड हात घालून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़