शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच दुचाकींसह कार लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:04 IST

शहरातील विविध रुग्णालये, महाविद्यालये, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, व्यापारी संकुलांच्या वाहनतळांवर डोळा ठेवत चोरट्यांकडून नाशिककरांच्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमधून तब्बल पाच दुचाकींसह एक चारचाकी मोटारही चोरट्यांनी लंपास केली आहे.

नाशिक : शहरातील विविध रुग्णालये, महाविद्यालये, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, व्यापारी संकुलांच्या वाहनतळांवर डोळा ठेवत चोरट्यांकडून नाशिककरांच्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमधून तब्बल पाच दुचाकींसह एक चारचाकी मोटारही चोरट्यांनी लंपास केली आहे. एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लुटून नेल्याने संताप व्यक्त होत आहे.सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असून चोरी, फसवणुकीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. सराफी दुकानांमधून बनावट महिला ग्राहकांकडून लंपास केले जाणारे दागिने, वाहनचोरी, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. या तीन दिवसांत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी गायब केल्या. यामध्ये भय्यासाहेब रविराज कोठवळे (रा. उंटवाडी) यांच्या मालकीची सुमारे ५० हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड दुचाकी (एमएच १५, जीटी ०१५०) त्यांनी डोंगरे वसतिगृहासमोर उभी केली होती. खरेदीसाठी कोठवळे येथील जवळच्या दुकानात गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांची ज्युपिटर दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडे कोठवळे यांनी तक्रार केली आहे.दुसऱ्या घटनेत पंकज मनोहर राणे (रा. उत्तमनगर) यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच ३०, एम ६३६१) दुचाकी चोरट्याने जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळामधून चोरी केली. तिसºया घटनेत जगन्नाथ संपत कांबळी (रा. सदिच्छानगर) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५, एआर ६८६२) चोरट्याने जिल्हा रुग्णालय आवारातून लंपास केली. उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतूनही प्रत्येकी एक दुचाकी चोरट्याने लंपास केली आहे. त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाणे हद्दीतून अल्टो-८०० ही दोन लाख रुपये किमतीची सोपान किसन कावळे यांच्या मालकीची मोटार राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.सिव्हील ‘सॉफ्ट टार्गेट’शहरातील दुचाकीचोरी करणाºया टोळीचे ‘सॉफ्ट टार्गेट’ जिल्हा रुग्णालयाचे वाहनतळ ठरत आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट- १च्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दोघा चोरट्यांनीही या वाहनतळातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी