शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 19:21 IST

या अपघातातल घनसोली आणि नवी मुंबईतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शैलेश कर्पे -

नाशिक - समृध्दी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेली कार सुमारे ३५ फूट उंच असलेल्या पुलाच्या कठड्यावरुन थेट अंडरपासच्या शिवार रस्त्यावर कोसळल्याची घटना सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातकारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातल घनसोली आणि नवी मुंबईतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घनसोली, नवी मुंबई येथील गोयल कुंटुबातील तिघे स्विफ्ट कार  (एम. एच. ४३ बी. यू ०१३२)ने घोटीकडून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. भरवीर येथील समृध्दी महामार्गाच्या टोल प्लाझाने एन्ट्री करुन ते समृध्दी महामार्गाने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. कार आगासखिंड शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. आगासखिंड शिवारात ५९०.५ किलोमीटरजवळ असलेल्या अंडरपासच्या पुलाजवळ दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या ब्रीजच्या संरक्षक कठड्याला कारने धडक दिली. त्यानंतर कार खालून जाणाऱ्या शिवार रस्त्यावर कोसळली. सुमारे ३५ फूट उंचावरुन कार आगासखिंडच्या शिवार रस्त्यावरील कूपनलिका रस्ता भागात कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.महामार्गाच्या कामावर असलेल्या काहीजणांनी अपघात पाहिल्यानंतर तातडीने टोलनाक्यावर अपघाताची माहिती कळविण्यात आली. या अपघातात सनरीस गोयल (५३), हेमीना गोयल (४८) व दिव्या गोयल(२४) सर्व रा. घनसोली, नवीमुंबई हे तीघे जखमी झाले. रुग्णवाहिकेतून त्यांना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गcarकारAccidentअपघात