नाशिक : दादरा व नगरहवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्मित मद्यसाठा महाराष्टÑात प्रतिबंधित असून या मद्यसाठ्याची अवैध वाहतूक गिरणारे व ढकांबे शिवारातून शहराच्या दिशेने होणार असल्याची खात्रीशिर गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागाच्या दोन स्वतंत्र पथकाने या मार्गांवर सापळा रचून अवैध मद्यसाठा वाहून नेणारी वाहने रोखली. सुमारे २२ लाख १० हजार रूपये किंमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला.याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, परराज्यात विक्र ीसाठी असलेल्या मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक मनोहर अंचुळे यांच्या नेतृत्त्वाखाली गिरणारे आणि ढकांबे शिवारात दोन पथकांनी स्वतंत्ररित्या सापळा रचला.गिरणारे शिवारातून शहराच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या महिंद्र पीकअप जीपवर(एमएच४८ एजी७०९४) पथकाला संशय आला. पथकाने जीप थांबवून तपासणी केली. यावेळी जीपमध्ये रॉयल चॅलेंज, इंपॅरिअल ब्ल्यू तसेच टुबर्ग बिअरच्या २६४ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. जीपचालक खेमिसंग भैरूसिंग दसाना (३२, रा. कोमलगड, जि. रासमंद, राजस्थान) यास अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये वाहनासह मद्यसाठा असा सुमारे १४ लाख ८० हजार ७६० रूपयांचा मुद्देमाल निरीक्षक एस.डी.चोपडेकर,दुय्यम निरीक्षक आर.आर.धनवटे यांच्या पथकाने हस्तगत केला. अधिक तपास धनवटे करीत आहेत.दुस-या कारवाईमध्ये ढकांबे शिवारात दुय्यम निरिक्षक एस.बी.शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी टेम्पो (जी.जे १५सीए ६४२९) या मालवाहू वाहनावर पथकाला संशय आला. पथकाने ते वाहन अडवून झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल चॅलेंज, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्की तसेच टुबर्ग बिअरचे खोके असा मद्यसाठा मिळून आले. यावेळी चालक रामिसंग किसनसिंग सिसोदिया (३३, रा. राजस्थान) यास बेड्या ठोकल्या. वाहनासह पथकाने ७ लाख २९ हजार २४० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्यात प्रतिबंध असलेला लाखो रूपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:06 IST
पथकाने ते वाहन अडवून झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल चॅलेंज, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्की तसेच टुबर्ग बिअरचे खोके असा मद्यसाठा मिळून आले. यावेळी चालक रामिसंग किसनसिंग सिसोदिया (३३, रा. राजस्थान) यास बेड्या ठोकल्या.
राज्यात प्रतिबंध असलेला लाखो रूपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत
ठळक मुद्देमद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती गिरणारे आणि ढकांबे शिवारात सापळा रचला.