कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार यादीची हरकती सुनावणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:36 PM2019-08-24T18:36:35+5:302019-08-24T18:38:14+5:30

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाच वर्षांचा कालावधी जानेवारी २०२० पूर्ण होत असल्याने इच्छुकांनी आत्तापासूनच फिल्ंिडग लावत निवडणुकीसाठी काम सुरू केल्याने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे.

Cantonment Board completes hearing on voter list | कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार यादीची हरकती सुनावणी पूर्ण

कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार यादीची हरकती सुनावणी पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देसातशे नावे वगळली : २९० नवमतदारांचे नावे समाविष्ट सातशे पैकी सर्वाधिक नावे वॉर्ड क्रमांक चारमध्ये ४३२ कमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदार यादीतील नावांवर घेतलेल्या आक्षेपांची सुनावणी पूर्ण झाली असून, १२८८ पैकी ७०० नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली, तर नव्याने २९० नावे मतदारांची नावे टाकण्यात आली.


देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाच वर्षांचा कालावधी जानेवारी २०२० पूर्ण होत असल्याने इच्छुकांनी आत्तापासूनच फिल्ंिडग लावत निवडणुकीसाठी काम सुरू केल्याने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे. मतदार यादीतील नावांबाबत तक्रारदार नसताना झालेल्या तक्रांरीबाबतच जास्त चर्चा कार्यालयात रंगली होती. ज्याप्रमाणे नावे कमी करण्याबाबत तक्रारी होत्या त्याच पद्धतीने २९० मतदारांची नावे नव्याने टाकण्यात आली आहे. सातशे पैकी सर्वाधिक नावे वॉर्ड क्रमांक चारमध्ये ४३२ कमी झाले असून, या वॉर्डात मागील निवडणुकीत सरळ लढत झाली होती. पाच वर्षांत मात्र अनेक इच्छुक तयारी लागले आहे.
मतदार यादीवर सुनावणी दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांसमोर लडाख येथे कार्यरत असलेल्या जवान धनंजय रासबिहारी सिंग आदींचे नावे मतदार यादीतून वगळण्याची तक्रार करण्यात आली होती. सदर अधिकाºयाने उपस्थित जवानाच्या पत्नीकडून जवानांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून खातरजमा करून घेतली. विशेष म्हणजे सदर जवान तीन-चार महिन्यांपासून देवळाली कॅम्पला नसताना त्याच्या नावाने तक्रार करणाºया विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना करण्यात आली आहे. घर दुसºया वॉर्डात, तर मतदार यादीत वीस नावे अन्य वॉर्डात आल्यामुळे निवडणूक मतदार यादीबाबत शंका व्यक्त होऊ लागली आहे. एका वॉर्डात तर ज्याच्या नावाने तक्रार आहे त्यानेच समोर येऊन आपले नाव मतदार यादीत ठेवण्याची विंनती केली आहे. घरपट्टी लागू नसलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असली तरी अनेक वॉर्डात तर मळ्यात काम करणारे यांसह नव्याने बांधकाम करणाºया कामगारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने हे मतदार कोणती घरपट्टी भरतात याचीच चर्चा रंगली आहे.

Web Title: Cantonment Board completes hearing on voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.