स्थायी समितीच्या रिक्त जागांसाठी निवडणूक अटळ उपाध्यक्षांची कबुली : भाजपा, राष्ट्रवादीची कोंडी
By Admin | Updated: November 12, 2014 01:22 IST2014-11-12T01:21:29+5:302014-11-12T01:22:33+5:30
स्थायी समितीच्या रिक्त जागांसाठी निवडणूक अटळ उपाध्यक्षांची कबुली : भाजपा, राष्ट्रवादीची कोंडी

स्थायी समितीच्या रिक्त जागांसाठी निवडणूक अटळ उपाध्यक्षांची कबुली : भाजपा, राष्ट्रवादीची कोंडी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दोन रिक्त झालेल्या जागांसाठी दोनपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने प्रशासनाला या दोन रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची कार्यवाही करणे जवळपास अटळ मानले जात आहे. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादीचे शैलेश सूर्यवंशी, बाळासाहेब गुंड यांच्याबरोबरच भाजपाच्या मनीषा बोडके व कॉँग्रेसच्या सुनीता अहेर यांचेही अर्ज शिल्लक असल्याने प्रशासनाला निवडणुकीची कार्यवाही करावी लागणार आहे. यातही संगीता ढगे यांनी निवडणूक बिनविरोध होणार असेल तर आपण माघार घेऊ अन्यथा आपणही निवडणुकीला सामोरे जाऊ, असा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर पुन्हा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे सत्तेत सहभागी झालेल्या भाजपाला केदा अहेर यांच्या रिक्त पदावर भाजपाच्याच त्यातही महिला सदस्य मनीषा बोडके यांची निवड अपेक्षित मानली जात आहे, तर प्रकाश वडजे यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादीला एक नव्हे, तर दोन सदस्यांची वर्णी स्थायी समितीवर लावावयाची असून, त्यानुसार बाळासाहेब गुंड व शैलेश सूर्यवंशी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.