कागदपत्रांची पूर्तता करतानाच उमेदवारांची दमछाक
By Admin | Updated: June 21, 2015 01:22 IST2015-06-21T01:21:53+5:302015-06-21T01:22:35+5:30
उमेदवारांची दमछाक नाशिक कृउबा निवडणूक :

कागदपत्रांची पूर्तता करतानाच उमेदवारांची दमछाक
मुंबई : कच्छी बांधवांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत आपले नाव कमावले असून, राज्याच्या विकासातदेखील त्यांनी मोठा हातभार लावला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले.
दादरच्या योगी सभागृहात ‘कच्छ शक्ती’ मासिकाच्या ३५व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कच्छ शक्ती’च्या माध्यमातून संपादक हेमराज शहा यांनी समाज विधायक पत्रकारिता केली असून ते विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहीले आहेत.
कच्छी बांधव वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यात पुढाकार घेत आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत तो आपला समाज, गाव, राज्य यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आज कच्छ रणाच्या बाहेर येऊन त्यांनी मोठे यश मिळवले आहे, असेही ते म्हणाले.
खा. पवार यांच्या हस्ते नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)