शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षप्राधिकरण समितीला हवी न्यायालयाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:31 IST

गेल्या मार्च महिन्यापासून रखडलेल्या वृक्षप्राधिकरण सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी समितीचे वैधानिक गठन होण्यास मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे. सदरची समिती योग्य आहे, यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून मान्यता घेणे आवश्यक असून मनपाने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच समितीला अधिकृतता प्राप्त होणार आहे.

नाशिक : गेल्या मार्च महिन्यापासून रखडलेल्या वृक्षप्राधिकरण सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी समितीचे वैधानिक गठन होण्यास मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे. सदरची समिती योग्य आहे, यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून मान्यता घेणे आवश्यक असून मनपाने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच समितीला अधिकृतता प्राप्त होणार आहे.महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीचे पदसिद्ध सभापती आयुक्त असतात. तर त्यांच्यासह एकूण १५ सदस्य नियुक्त करता येतात, परंतु समिती सदस्यपदासाठी शासनाने पात्रता निश्चित केल्या असून, त्यानुसार नगरसेवकांना बीएस्सी पदवी असणे आवश्यक आहे तर अन्य अशासकीय सदस्यांचा प्रत्यक्ष वनीकरणातील सहभाग आवश्यक आहे. याबाबतचे निकष न पाळताच समिती गठित झाल्याने गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने समिती बेकायदेशीर ठरवली होती आणि त्यानंतर पात्रता निकषानुसार नूतन सदस्य नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यावेळी विधान परिषदेच्या दोन सलग निवडणुका झाल्याने आदर्श आचारसंहितेमुळे महापालिकेने निर्णय घेतला नव्हता. तर अलीकडेच दोन महासभेत हा विषय पात्रतेच्या निकषानुसारच गाजला. बीएस्सी झालेल्या नगरसेवकांना प्राधान्य द्यावे, असा न्यायालयाचा आदेश असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे होते. त्यानुसार महापौरांना सर्वाधिकार देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या विरोधात भूमिका न घेताच महापौरांनी चंद्रकांत खाडे आणि वर्षा भालेराव या दोघांची समितीवर निवड केली आणि अन्य दोन अशासकीय सदस्य प्रशासनाच्या प्रस्तावानुसार नियुक्त केले होते.सदस्य वाढविले जाणारमहापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत आणखी सदस्य वाढू शकतात. समितीत पंधरा सदस्य नियुक्तीची तरतूद असून, आतापर्यंत चार सदस्य नियुक्त आहेत. परंतु समितीच्या सध्याच्या सदस्यांना मान्यता मिळाल्यानंतर आणखी सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका