उमेदवारांनी खर्च सादर करणे बंधनकारक
By Admin | Updated: February 9, 2017 23:15 IST2017-02-09T23:15:16+5:302017-02-09T23:15:32+5:30
उमेदवारांनी खर्च सादर करणे बंधनकारक

उमेदवारांनी खर्च सादर करणे बंधनकारक
मालेगाव : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे.
खर्च सादर न केल्यास उमेदवारी धोक्यात येऊ शकते. आयोगाने यावेळी उमेदवारी अर्जापाठोपाठ खर्चही आॅनलाइन सादर करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आॅनलाइन खर्च देताना उमेदवारांच्या समर्थकांची दमछाक होत आहे. येथील प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांना काही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आॅफलाइन खर्च चालेल का? आॅनलाइन मिळत नाही, काही उमेदवारांकडे साधा मोबाइलही नाही, यांसह अनेक प्रश्न विचारले. यावेळी मोरे यांनी शांतपणे सर्वांच्या अडचणी जाणून घेतल्या. निवडणूक आयोगाचा आदेश आहे. जिल्हास्तरावर विचारणा करतो असे सांगितले. काहींनी राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी केल्या असून, खर्च आॅफलाइन घ्यावा, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)