Cancellation of 5% TDS tax on cash | रोख रकमेवरील ०२ टक्के टीडीएस कर रद्द
लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप

ठळक मुद्देसुवर्णा जगताप : बाजार समितीने केलेल्या पाठपुराव्यास यश

लासलगाव : केंद्र शासनाने प्राप्तीकर कायद्यात बदल करून १ कोटीपेक्षा अधिक रक्कम बँकेतुन काढल्यास ०२ टक्के टीडीएस कर आकारण्याचा कायदा दि. १६ सप्टेंबर २०१९ पासुन रद्द करण्यात आल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
केंद्र शासनाने प्राप्तीकर कायदा १९६१ चे कलम १९४ एन मध्ये बदल करून दि. १ सप्टेंबर २०१९ नंतर बँकेच्या खात्यामधुन १ कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्यावर ०२ टक्के रक्कम उद्दम कर (टीडीएस) म्हणुन कपात करणेची तरतुद केल्याने येथील व्यापारी वर्ग, शेतकरी बांधवांना दि. १ सप्टेंबर २०१९ पासुन शेतीमाल विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात अदा न करता त्यांच्या बँक खात्यावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने, आरटीजीएस, एनइएफटी किंवा इतर मान्य पध्दतीने हस्तांतरीत करीत आहे.
त्यामुळे येथील शेतकरी बांधवांना शेतीमाल विक्र ीनंतर मिळणाऱ्या रोख पैशांमधुन त्यांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी माठ्या प्रमाणावर अडचण येत आहे. सदर अडचणींमुळे शेतकरी बांधवांमध्ये केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत असंतोष निर्माण झालेला असल्याने शेतकरी बांधवांची दैनंदीन आर्थिक निकड विचारात घेऊन लासलगाव बाजार समितीने व्यापारी व शेतकरी बांधवांना अदा करावयाच्या शेतीमाल विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात अदा करणेसाठी बँकेतुन काढावयाच्या रोख रकमेवरील ०२ टक्के उद्दम कर (टीडीएस) रद्द करणेबाबत दि. १३ सप्टेंबर २०१९ रोजी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.
त्याप्रमाणे केंद्र शासनाने लासलगाव बाजार समितीच्या निवेदनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून दि. १६ सप्टेंबर २०१९ पासुन प्राप्तीकर कायद्यात बदल करून १ कोटीपेक्षा अधिक रक्कम बँकेतुन काढल्यास ०२ टक्के टीडीएस कर कपातीचा निर्णय रद्द केला असल्याची माहिती सुवर्णा जगताप यांनी दिली.

 


Web Title: Cancellation of 5% TDS tax on cash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.