रासायनिक खतावरील विक्र ी कर रद्द करा
By Admin | Updated: August 26, 2016 22:23 IST2016-08-26T22:23:17+5:302016-08-26T22:23:27+5:30
अंबादास बनकर : मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

रासायनिक खतावरील विक्र ी कर रद्द करा
येवला : रासायनिक खतावरील शेतकरी पातळीवर विक्री कर (व्हॅट) रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा सहकार चळवळीचे
नेते अंबादास बनकर यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सबंधितांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जोपसणाऱ्या सहकारी संस्था या वेळोवेळी रासायनिक खतांचा योग्य किमतीत पुरवठा करतात. अशा सहकारी संस्थांना विक्री कर विभागाकडून साडेपाच टक्के रासायनिक विक्री कर आकारला जातो. या संस्था अत्यल्प नफा तत्त्वावर व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेत.
खत कंपनीकडून खते विकत घेतल्यानंतर शेतकऱ्यांना संस्था १० ते १५ रुपये शासनाने ठरवून दिलेल्या अल्प नफ्यावर विक्री करतात. या अल्प नफ्यावर संस्था चालविणे अवघड झाले आहे. राज्यात तीन ते चार लाख खत विक्रेत्यांच्या
विक्री कर, दंड भरण्यासाठी विक्री
कर कार्यालयात केसेस चालू आहेत. या प्रकारामुळे खत विक्री संस्था
बंद होण्याच्या स्थितीत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांना शेतीपयोगी रासायनिक खते वेळेवर मिळणार नाहीत. परंतु खत विक्री करणाऱ्या सहकारी संस्थाचा व्हॅट व दंड संस्था पातळीवर रद्द केल्यास सरकारचा कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही. त्यामुळे हा व्हॅट कंपन्यांनाच विक्री करताना वसूल करण्यास सांगावे, असे बनकर यांनी पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)