शेतीपिकांचे नुकसान/ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
कळवण : पूनद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगराजवळ २३ किमी अंतरावर नवीबेज शिवारात फुटल्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नाल्याद्वारे वाहणारे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी बांधवानी केली असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रगतिशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे
बेज शिवारातील नितीन पगार व बापू आहेर यांच्या घराजवळच ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कालव्याच्या आतील बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणच्या आतील भागाला मोठे भगदाड पडल्याने परिसरातील ४० ते ५० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. रात्री अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. चणकापूर धरणातून उजव्या कालव्यास पूर पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यास भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आले . या पाण्यामुळे पाटाखालच्या शेकडो एकर शेतातील उभी पिके, अति पाण्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांदाचाळीत व घरात पाणी शिरले. पाणी वाहत असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली. कालव्या पलीकडचे डोंगर उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी पाटाखालून सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत . या पाइपच्या ठिकाणीच भगदाड पडून कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची तत्काळ पाहणी करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजेंद्र शिंदे, गोपाळ शिंदे, दत्तू पगार, अशोक शिंदे, जयेश शिंदे, कल्पना शिंदे, गौरव शिंदे, रत्नाबाई शिंदे, महादू आहेर, रामदास दशपुते, सुरेश शिंदे आदींनी केली आहे.
कोट....
नवीबेज शिवारातील माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कोबी, सोयाबीन, तुवर, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी घुसले आहे . शासनाने या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी .
- रामकृष्ण पगार, शेतकरी
कोट....
तीन दिवसांपूर्वी कालव्याला गळती लागली होती. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सिमेंट गोणी टाकून दुरुस्ती केली होती. मात्र तरीही पाणी न थांबल्याने भगदाड पडले आहे. पाणी बंद करण्यात आले आहे. माती भर टाकून दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडण्यात येईल.
- व्ही. ए. टिळे, उपकार्यकारी अभियंता, चणकापूर उजवा कालवा
फोटो- ०४ कळवण कालवा
040921\04nsk_43_04092021_13.jpg
फोटो- ०४ कळवण कालवा