मतदार नोंदणीची व्याप्ती ९ जूनपासून शाळांमध्ये मोहीम

By Admin | Updated: June 1, 2014 01:27 IST2014-05-31T23:27:35+5:302014-06-01T01:27:28+5:30

नाशिक : सध्या राबविण्यात येणार्‍या निरंतर मतदान नोंदणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, निवडणूक यंत्रणेवर पडणारा या मोहिमेचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आता मतदान केंद्रांवरच ९ जूनपासून शिक्षकांकरवी मतदार नोंदणी करण्याबरोबरच चार दिवस विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

Campaign for the registration of voters from 9th June in schools | मतदार नोंदणीची व्याप्ती ९ जूनपासून शाळांमध्ये मोहीम

मतदार नोंदणीची व्याप्ती ९ जूनपासून शाळांमध्ये मोहीम

नाशिक : सध्या राबविण्यात येणार्‍या निरंतर मतदान नोंदणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, निवडणूक यंत्रणेवर पडणारा या मोहिमेचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आता मतदान केंद्रांवरच ९ जूनपासून शिक्षकांकरवी मतदार नोंदणी करण्याबरोबरच चार दिवस विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांची मोठ्या संख्येने नावे गहाळ झाल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने २९ मेपासून निरंतर मतदार नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात विशेष करून नवीन मतदारांची नावे नोंदविण्याबरोबरच ज्यांची नावे यादीतून गहाळ झाली आहेत, त्यांनाही या मोहिमेद्वारे नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु सदरचे काम विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातील निवडणूक शाखेतच केले जात असल्याने या मोहिमेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आता या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, सहनिवडणूक अधिकार्‍यांकडे निरंतर मतदार नोंदणी मोहीम ८ जूनपर्यंत राबविण्यात येईल. त्यानंतर ९ जूनपासून प्रत्येक मतदान केंद्रावर म्हणजेच शाळांमध्ये शिक्षकांकरवी दररोज मतदार नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रावर सर्व प्रकारचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त २१ व २२ तसेच २८ व २९ जून या चार दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Campaign for the registration of voters from 9th June in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.