नाशिक, नगरमध्ये अभियान

By Admin | Updated: September 6, 2016 01:36 IST2016-09-06T01:36:24+5:302016-09-06T01:36:44+5:30

कळवण पॅटर्न : गणेश मंडळांना त्वरित वीजजोडणी देण्याच्या सूचना

Campaign in Nashik, Nagar | नाशिक, नगरमध्ये अभियान

नाशिक, नगरमध्ये अभियान

कळवण : गणेशोत्सव कालावधीसाठी गणेश मंडळांना जागेवर जाऊन अर्ज अन तत्काळ वीजजोडणी हा कळवण पॅटर्न नाशिक व नगर जिल्ह्यात राबविण्याबाबतच्या सूचना वीज वितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दिल्याने नाशिक, नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कळवण पॅटर्न उपक्र माचे स्वागत केले जात आहे
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मागेल त्याला वीज या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांना जागेवर वीज मागणी अर्ज अन् कोटेशन भरून तत्काळ वीजजोडणी व मीटर या उपक्रमाचे कळवण शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळांनी स्वागत केले. या उपक्र मात कळवण शहर व तालुक्यातील २० गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असल्याबाबत वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांनी त्याची दखल घेऊन उपक्र माचे कौतुक केले.
वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता गोपुळवाड व उपकार्यकारी अभियंता एच. आर. खैरनार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून कळवण पॅटर्नचे कौतुक केले असून, नाशिक, नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व शहरात गणेशोत्सवात कळवण पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर उपक्र म तत्काळ राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. कळवण पॅटर्न राबविण्यात दिरंगाई केल्यास किंवा गणेश मंडळांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Campaign in Nashik, Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.