शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात मद्यतस्करांच्या विरोधात मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:14 IST

राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकामार्फत नाशिाक जिल्ह्यात चोरी छुप्या पद्धतीने आणण्यात येणा-या दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशातील निर्मित मद्य वाहतुकीविरूद्ध मेहिम उघडण्यात आली आहे. त्यासाठी काही प्रमुख मार्गावर

ठळक मुद्देदेशी, विदेशी दारू वाहतुकीचे वाहने ताब्यातराज्य उत्पादन शुल्क : दोघांना अटक

नाशिक : पर राज्यातून बेकायदेशीरपणे अवैध दारूची आयात करणा-या मद्यतस्करांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहिम सुरूच असून, नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंबोली तसेच चांदवड-लासलगाव रस्त्यावर दोन ठिकाणी सापळा रचून देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणा-या दोन वाहने ताब्यात घेवून त्यातील लाखोंचा माल जप्त करण्यात येवून दोघा मद्यतस्करांना अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकामार्फत नाशिाक जिल्ह्यात चोरी छुप्या पद्धतीने आणण्यात येणा-या दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशातील निर्मित मद्य वाहतुकीविरूद्ध मेहिम उघडण्यात आली आहे. त्यासाठी काही प्रमुख मार्गावर नाकाबंदी व तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर नजिकच्या आंबोली येथे संशयावरून राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिका-यांनी मारूती व्हॅगनर या कारची तपासणी केली असता त्यात दोन लाख १० हजाराचे विदेशी मद्य दडविलेले सापडले. या मद्याची वाहतूक करणा-या गोविंद भोर रा. नाशिक या मद्यतस्कराला ताब्यात घेण्यात आले आहे. असाच प्रकार चांदवड-लासलगाव रस्त्यावरील संशयावरून झडती घेतलेल्या टोयाटो इनोव्हा कारमधून देशीदारूची विना परवाना वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. कारचालक सुर्यभान जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून, कारसह साडेअकरा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई उप अधीक्षक गणेश बारगजे, निरीक्षक एस. डी. चोपडेकर, उत्तम आव्हाड तसेच विलास बामणे, हवालदार महेंद्र बोरसे, चव्हाणके, श्याम पानसरे, धनराज पवार आदींनी पार पाडली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक