नाशिक : तांबोळी चौरसिया सेवा ट्रस्ट व सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धिविनायक शाळेतील मानसिक दिव्यांग मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्मायलिंग एज्युकेशन फाउंडेशन, यूपीएससी युनिव्हर्सल फाउंडेशनचे राहुल शिंदे, मंगेश खैरनार, राष्ट्रीय खेळाडू खंडू कोतकर यांनी विद्यार्थ्यांना भेट देत मार्गदर्शन केले. यावेळी विशाल तांबोळी, डॉ. अभिषेक जुन्नरकर, रंजना तांबोळी, सतीश काळे, तुषार बाविस्कर, हेमंत नाईकवाडे, योगेश आडभाई, मुख्याध्यापक दीपाली सूर्यवंशी, प्रतिभा गवळी, प्रवीण कांबळे, मालती बच्छाव, मंगला महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश सूर्यवंशी यांनी केले.
सिद्धिविनायक शाळेतील दिव्यांग मुलांसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:18 IST