कचरा वेचणाऱ्या महिलांना कॅमेऱ्याचे प्रशिक्षण
By Admin | Updated: July 12, 2014 00:25 IST2014-07-11T23:41:36+5:302014-07-12T00:25:58+5:30
कचरा वेचणाऱ्या महिलांना कॅमेऱ्याचे प्रशिक्षण

कचरा वेचणाऱ्या महिलांना कॅमेऱ्याचे प्रशिक्षण
नाशिक : शहरातील आम्रपाली आणि गंजमाळ येथील झोपडपट्टीतील कचरा वेचक महिलांना त्यांचे हक्क व अधिकार समजावे यासाठी त्यांना अभिव्यक्ती संस्थेच्या वतीने कॅमेऱ्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.
या महिलांनी ‘जगावे कसे’ आणि ‘आम्ही कचरा वेचक‘ दोन समुदाय व्हिडिओची निर्मिती केली आहे. पंडित पलुस्कर सभागृहात या दोन्ही फिल्म्समचे उद्घाटन करण्यात येणार आहे. घंटागाडी कर्मचारी, कचरा वेचक चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे अवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)