शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा हमीभावासाठी लोकप्रतिनिधींना फोन करो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 17:43 IST

येवला : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला प्रती किलो वीस रूपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करो, आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकांद्याला वीस रु पये प्रती किलो हमीभाव द्यावा अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला प्रती किलो वीस रूपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करो, आंदोलन करण्यात आले.कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार, खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, माजी आमदार यांना फोन करून कांद्याला वीस रु पये प्रती किलो हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. कांद्याचे भाव गगनाला भिडतात तेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करते. ग्राहक हित बघितले जाते परंतु कांद्याचे भाव पडल्यावर, कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो त्या वेळेस कांद्याचे भाव वाढीसाठी कुठलीही राज्याची किंवा केंद्राची सरकारी यंत्रणा काम करत नाही. मार्केटमध्ये कांद्याला पाच ते सहा रु पये किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. ही व्यथा मांडण्यासाठी सदर आंदोलन केल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितले.येवला तालुक्याचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. भारती पवार यांनी सकाळी केलेल्या फोनला कुठलाही प्रतिसाद दिला नाही, याउलट खासदार हेमंत गोडसे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व निश्चितच आपली मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यापर्यंत पोहोचू अशी ग्वाही दिल्याचे भोरकडे यांनी सांगितले.सदर आंदोलनात पिंपळगाव जलाल येथील बाळासाहेब बनकर, किशोर खोकले, नारायण मोरे, रवी मोरे, गोकुळ भोरकडे आदींनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी