बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:07 IST2020-01-18T23:26:05+5:302020-01-19T01:07:44+5:30
गिरणारे वाडगाव रस्त्यावर मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला काटेरी झुडपाच्या दिशेने ओढून नेले. घराकडे परतत असताना मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांना रस्त्यावरून बिबट्याने काहीतरी ओढून नेत असल्याचे दिसताच त्यांनी गाडी थांबविली असता त्यांना वासरू ठार झाल्याचे दिसले, त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला माहिती कळविली त्यांना रात्री काही मदत मिळाली नाही दिवसा ११-१२च्या सुमारास पंचनामा करण्यात आला.

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
गंगापूर : गिरणारे वाडगाव रस्त्यावर मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला काटेरी झुडपाच्या दिशेने ओढून नेले. घराकडे परतत असताना मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांना रस्त्यावरून बिबट्याने काहीतरी ओढून नेत असल्याचे दिसताच त्यांनी गाडी थांबविली असता त्यांना वासरू ठार झाल्याचे दिसले, त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला माहिती कळविली त्यांना रात्री काही मदत मिळाली नाही दिवसा ११-१२च्या सुमारास पंचनामा करण्यात आला.
घटनेची गांभीर्यता वनविभागाला काहीच नसल्याचेच दिसले, गिरणारे, वाडगाव, मनोली, नाईकवाडी, साडगाव, लाडची व आजूबाजूच्या गावातील परिसरात बिबट्याचे दर्शन व त्याचे हल्ले हे नित्याचेच झाले असून, आता या भागातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे पशुधनही सुरक्षित नसल्याचे दिसते. वनविभागाने वेळीच योग्य ती पावले उचलली नाही तर वनविभागाच्या कार्यालयावर शेतकरी व पशुधनासह आंदोलन छेडण्याचा इशारा दगूनाना थेटे, नारायण थेटे, प्रवीण थेटे, दीपक कसबे, भाऊसाहेब थेटे यांनी दिला आहे.
गिरणारे, वाडगाव, मनोली, नाईकवाडी, साडगाव, लाडची व आजूबाजूच्या गावातील परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने तसेच बिबट्याला खाण्यासाठी व पिण्यासाठी मळे परिसरात कुत्रे, बकºया, वासरे असल्याने तो वस्ती, मळे, गावात येत असतो, यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, त्वरित वनविभागाने त्याला पिंजरा लावून जेरबंद करावे. अन्यथा परिसरातील सर्व शेतकऱ्यांसह व त्यांच्या पशुधनासह वनविभागाच्या कार्यालयावर येऊन आंदोलन करावे लागेल.
- गोरख थेटे, शेतकरी, गिरणारे