मांजरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By Admin | Updated: September 14, 2015 23:12 IST2015-09-14T23:10:19+5:302015-09-14T23:12:20+5:30
निफाड : परिसरात वावर सुरूच

मांजरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
निफाड : तालुक्यातील मांजरगाव येथे बिबटएाने सोमवारी (दि.१४ ) पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे गंगाथडी भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीेचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील सानगाव-मांजरगाव रस्त्यालगत वसती असलेल्या सुभाष नामदेव सोनवणे यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून गायीजवळ बांधलेल्या तीन महिन्याच्या वासराला ठार केले. सकाळी सोनवणे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यामुळे दुपारच्या सुमारास गाजवाडी येथून पिंजरा आणून सोनवणे यांच्या शेताजवळ लावण्यात आला आहे. (वार्ताहर)
बिबट्याची दहशत
उसाचा पट्टा असलेल्या गोदावरीच्या किनारी भागातील गंगाथडीच्या गावांच्या परिसरात बिबट्यांचा जास्त वावर आहे. या परिसरातील काही बालकांचाही बिबट्याचे बळी घेतला असून शेतकर्यांवरही हल्लाचे प्रकार घडत आहेत. तसेच परिसरातील शेळ्य़ा, कुत्रे व शेत परिसरातील कोल्हे यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये बिबट्याटी दहशत पसरली आहे.