हनुमानवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By Admin | Updated: November 14, 2016 00:45 IST2016-11-14T00:40:53+5:302016-11-14T00:45:36+5:30
हनुमानवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

हनुमानवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
नागरिक भयभीत : पिंजरा लावण्याची मागणीनाशिक : हनुमानवाडी परिसरातील कोशिरे मळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़ शहराच्या मध्यवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी तसेच नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे़
हनुमानवाडी परिसरात चंद्रकांत कोशिरे यांची आठ एकर शेती असून त्यामध्ये ज्वारी, मका व सोयाबीन, ऊस ही पिके घेतली होती़ ज्वारीचे पीक काढल्यानंतर उसाशेजारील शेतात त्यांनी पाच वासरे बांधलेली होती़ रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चंद्रकांत कोशिरे हे ट्रॅक्टर घेऊन शेतात जात होते़ त्यांना बांधलेले पाचपैकी एक वासरू दृष्टीस न पडल्याने त्यांनी जवळ जाऊन बघितले असता एका वासराच्या गळ्याजवळ मोठी जखम झाल्याचे आढळून आले़ त्यांनी या वासरास इतर वासरांपासून दूर नेऊन ठेवले़
कोशिरे हे काही वेळाने पुन्हा जखमी वासराकडे गेले असता त्याच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केल्याचे आढळून आले़ मात्र तोपर्यंत वासराचा मृत्यू झाला होता़ याबाबत त्यांनी पोलीस ठाणे व वनविभागास माहिती दिली़ या दोघांनी घटनास्थळी पोहोचल्या व शोध घेतला मात्र त्यांना बिबट्या आढळून आला नाही़