बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:14 IST2018-05-25T00:14:45+5:302018-05-25T00:14:45+5:30

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी
ठळक मुद्दे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम भागातील बेलू शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू जखमी झाले. भीमा जयराम तुपे यांच्या कांद्याच्या चाळीत गाय-वासरू बांधलेले होते. बिबट्याने पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वासरावर हल्ला केला. वासराला सुमारे ५० फूट ओढत नेले. तुपे यांच्या सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. तुपे कुटुंबीय जागे झाल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान, या परिसरास बिबट्याची दहशत निर्माण झाली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.