छावणी परिषद वॉर्ड आरक्षण सोडत आज

By Admin | Updated: August 5, 2014 01:50 IST2014-08-05T01:38:39+5:302014-08-05T01:50:25+5:30

छावणी परिषद वॉर्ड आरक्षण सोडत आज

Cadet Council Ward Reservations today | छावणी परिषद वॉर्ड आरक्षण सोडत आज

छावणी परिषद वॉर्ड आरक्षण सोडत आज

 

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेची वॉर्ड आरक्षण सोडत उद्या मंगळवारी दुपारी १२ वाजता देवळाली छावणी परिषदेच्या कार्यालयात होणार आहे.
गेल्या वर्षी मतदान नोंदणी झाल्यानंतर वॉर्डाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. परंतु विद्यमान बोर्डाला वाढीव मुदत मिळाल्याने व मतदार संख्येत झालेली वाढ या कारणास्तव संरक्षण विभागाने नव्याने वॉर्डांची आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आले आहेत. त्याप्रमाणे ब्रिगेडीयर यांच्या अध्यक्षतेखाली वॉर्डाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी दुपारी १२ वाजता छावणी परिषद कार्यालयात काढण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी काढलेल्या आरक्षण सोडतीत वॉर्ड क्र. १, ४ व ८ हे तीन वॉर्ड महिला राखीव झाले होते. मात्र आता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने राजकीय क्षेत्राचे त्याकडे लक्ष लागून आहे.
लोकनियुक्त प्रतिनिधी कोण?
मे महिन्यात नगरसेवकांची वाढीव मुदत संपल्याने प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात प्रशासकीय राजवटीमध्ये एक लोकनियुक्त प्रतिनिधी घेतला जातो. त्याकरिता दहा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही संरक्षण विभागाकडून लोकनियुक्त प्रतिनिधीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. याकडेही कॅम्पवासीयांचे लक्ष आहे. (वार्ताहर)

Web Title: Cadet Council Ward Reservations today