खरेदी तीन गुंठे जागेची; नोंद मात्र एकाच गुंठ्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:08 IST2017-08-26T01:08:51+5:302017-08-26T01:08:56+5:30
नेव्हीत असणाºया एका सैनिकाने घोटी शहरालगत तीन गुंठे जागा खरेदी करूनही घोटीतील तलाठ्याकडे असणाºया कंत्राटी कामगाराने तीन गुंठ्याच्या ऐवजी केवक एकाच गुंठ्याची उताºयावर नोंद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत संबंधित तलाठ्याकडे तक्र ार करूनही दखल न घेतल्याने या सैनिकाने संताप व्यक्त केला आहे.

खरेदी तीन गुंठे जागेची; नोंद मात्र एकाच गुंठ्याची
घोटी : नेव्हीत असणाºया एका सैनिकाने घोटी शहरालगत तीन गुंठे जागा खरेदी करूनही घोटीतील तलाठ्याकडे असणाºया कंत्राटी कामगाराने तीन गुंठ्याच्या ऐवजी केवक एकाच गुंठ्याची उताºयावर नोंद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत संबंधित तलाठ्याकडे तक्र ार करूनही दखल न घेतल्याने या सैनिकाने संताप व्यक्त केला आहे. घोटी येथील रवींद्र यशवंत लहामगे यांनी एप्रिल महिन्यात मच्छिंद्र एकनाथ जाधव यांच्या मालकीच्या ३१४/१ या शेतजमिनीतील अकरा गुंठ्यापैकी तीन गुंठे जागा खरेदी केली होती. ही खरेदी झाल्यानंतर त्यांनी तत्काळ या जमिनीवर आपल्या नावे लागण्यासाठी तलाठी कार्यालय गाठून दस्तऐवज दिले होते. घोटीतील तलाठी कार्यालयात असणाºया कंत्राटी कामगाराने तीन गुंठ्याऐवजी एकाच गुंठ्याची नोंद करीत यावर तलाठी आणि मंडल अधिकाºयाला अंधारात ठेवून नोंद केली आहे.