शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अट रद्द करून शिल्लक मका खरेदी करा - शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:04 IST

शासकीय आधारभूत धान्य खरेदी योजनेअंर्तगत येवला तालुका खरेदी-विक्री संघाला रब्बी हंगामाच्या मका पिकाची आॅनलाइन नोंदणी करून मका खरेदी करण्याचे शासकीय आदेश प्राप्त झाले असले तरी रब्बीपेक्षाही खरीप हंगामाचा ५० हजार क्विंटल मका अद्याप शिल्लक आहे. मक्याचे कोसळलेले बाजारभाव पाहता शासनाने आॅनलाइन नोंदणी व खरेदीसाठी खरीप-रब्बी हंगामाची अट न ठेवता तालुक्यात शिल्लक असलेला सर्व मका सरसकट खरेदी करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.

येवला : शासकीय आधारभूत धान्य खरेदी योजनेअंर्तगत येवला तालुका खरेदी-विक्री संघाला रब्बी हंगामाच्या मका पिकाची आॅनलाइन नोंदणी करून मका खरेदी करण्याचे शासकीय आदेश प्राप्त झाले असले तरी रब्बीपेक्षाही खरीप हंगामाचा ५० हजार क्विंटल मका अद्याप शिल्लक आहे.मक्याचे कोसळलेले बाजारभाव पाहता शासनाने आॅनलाइन नोंदणी व खरेदीसाठी खरीप-रब्बी हंगामाची अट न ठेवता तालुक्यात शिल्लक असलेला सर्व मका सरसकट खरेदी करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.येवला तालुका खरेदी-विक्र ी संघाला रब्बी हंगामाची मका आॅनलाइन नोंदणी व खरेदीच्या प्राप्त झालेल्या आदेशानुसार, खरीप मका पिकाची नोंद ग्राह्य धरली जाणार नाही. आज रोजी तालुक्यात ५० हजार क्विंटल खरीप मका विक्र ीसाठी शिल्लक आहे. ११०० ते १२०० रु पये प्रतिक्विंटल या कवडीमोल बाजारभावाने मक्याची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. राज्यभर लॉकडाउनला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे जाऊन रब्बी हंगाम मका नोंद करणेही अवघड झाले आहे. शासनाने फक्त रब्बी हंगामातील मका खरेदी न करता शिल्लक खरीप हंगामाचीही सर्व मका खरेदी करावा. जेणेकरून शेतकºयांना आर्थिक आधार मिळून लॉकडाउन काळात न्याय मिळेल. तालुक्यात शिल्लक असलेला खरीप व रब्बी हंगामाची मकाही चांगल्या प्रतिचाच असून, शासनाने खरीप व रब्बी हंगामाची अट वगळावी. आहे त्या खरीप मका नोंदीच्या आधारेच नोंदणी करून मका खरेदी करून शेतकºयांना दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.अ‍ॅड. शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती