ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:13 IST2021-04-17T04:13:30+5:302021-04-17T04:13:30+5:30

राहुल ढिकले व भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेत ...

Buy an oxygen concentrator machine | ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन खरेदी करा

ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन खरेदी करा

राहुल ढिकले व भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेत औद्योगिक कंपनीच्या व्यवस्थापकांसमवेत चर्चा करत जिल्हा रुग्णालय, भाजपा, मनपा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडाच्या माध्यमातून ईएसआयसी दवाखाना सातपूर ५० बेड, आयुर्वेद रुग्णालय १०० बेड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे १०० बेड उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक थोरात यांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालयात १०० बेड वाढविण्यासाठी लागणारी नवीन ऑक्सिजन लाइन करण्याच्या मागणीनुसार शहरातील देणगीदारांशी चर्चा केली. पूर्व मतदारसंघात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांना, तसेच नातेवाइकांना ऑक्सिजन बेडसाठी वणवण करावी लागत असल्याने ढिकले यांनी मतदारसंघातील मनपा व शासकीय दवाखान्यासाठी आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर १५० मशीन उपलब्ध करून देण्याचे पत्र मांढरे यांना दिले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्राचार्य प्रशांत पाटील, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव उपस्थित होते.

(फोटो १६ ढिकले)

Web Title: Buy an oxygen concentrator machine