वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By Admin | Updated: August 23, 2015 23:47 IST2015-08-23T23:46:41+5:302015-08-23T23:47:08+5:30

पोलिसांचा छापा : अल्पवयीन मुलीसह तीन संशयित अटकेत

Busted gang of gas-fired vehicles | वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

इंदिरानगर : भगतसिंग वसाहत व शरयुनगरीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी छापा टाकून ११ सिलिंडर, दोन मशीन असा सुमारे २४ हजारांचा माल हस्तगत केला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी डमी गिऱ्हाईक भगतसिंग वसाहतीमधील घरगुती गॅस सिलिंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी पाठविला. त्यास संबंधितांनी सहमती दर्शवली. तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जमील शेख व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी १० घरगुती गॅस सिलिंडर आणि एक मशीन असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे, अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्यात येत होता. याप्रकरणी भगतसिंगनगरमधील शेख अजमल शेख अहमद (२३) याच्यासह एक अल्पवयीन मुलगी तर शरयुनगरमधून गणेश जगन्नाथ संगीतकार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: Busted gang of gas-fired vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.