सुट्या भागाच्या प्रतीक्षेत बसेस नव्या बसेसची गरज : लाखो भाविकांना केवळ बसचाच आधार
By Admin | Updated: April 22, 2015 01:30 IST2015-04-22T01:28:55+5:302015-04-22T01:30:20+5:30
सुट्या भागाच्या प्रतीक्षेत बसेस नव्या बसेसची गरज : लाखो भाविकांना केवळ बसचाच आधार

सुट्या भागाच्या प्रतीक्षेत बसेस नव्या बसेसची गरज : लाखो भाविकांना केवळ बसचाच आधार
नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या बसेसची होत असलेली अवस्था तसेच प्रवासादरम्यान बसेस बिघडण्याचे प्रमाण वाढल्याने व दुरुस्तीचे साहित्यच नसल्याने शहर बस वाहतुकीतली अनेक बसेस बंद करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे. महामंडळाच्या भांडार विभागाच्या खरेदीअभावी बसेस दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध होत नसल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुख्य म्हणजे आगामी काही महिन्यांत येणाऱ्या सिंहस्थात लाखो भाविकांची वाहतूक करण्याची जबाबदारी असलेल्या महामंडळाच्या बसेस अशा असतील, तर सिंहस्थ निर्विघ्न कसा पार पडेल याबद्दलही साशंकता वर्तवली जात आहे. एकीकडे उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या महामंडळात गेल्या काही दिवसांपासून बसेसची अवस्था खराब झाली आहे. गीअर बॉक्स खराब होणे, टायर पंक्चर होणे यांसारख्या किरकोळ बिघाडांमुळेही बसमधील प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने याची खबरदारी घेत अनेक बसेसच्या फेऱ्याच बंद केल्या आहेत. जवाहरलाल नेहरू उत्थान योजनेअंतर्गत शहर महामंडळाला नव्याकोऱ्या बसेस मिळाल्या असल्या, तरी त्याचे साहित्य नसल्याने अनेक बसेसला व्हायपरसुद्धा उपलब्ध नाही. परिणामी नवी बस आणि जुन्या गाडीचे साहित्य असा प्रकार दिसून येतो आहे. गाडी खराब (ब्रेकडाउन) झाल्यास दोन दोन तास पर्यायी गाडी मिळत नाही. नेहरू योजनेतून आलेल्या नव्या आधुनिक बसेसची वाताहत झाली असून, या बसेसच्या फुटलेल्या काचांऐवजी गाडीवर पत्रे ठोकले जात असल्याने केवळ शोभनीय वस्तू म्हणूनच या बसेस आणण्याचा गाजावाजा केला गेला का? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. सिंहस्थासाठी नव्या बसेससह इतर जिल्'ातून बसेस कार्यरत राहणार असल्या तरी किमान नाशिकसाठी हा उत्पन्न मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्याचा लाभ उठवलाच पाहिजे, असे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचेही मत आहे. परंतु त्यासाठी कोणतेही पाऊले उचलली जात नसल्याचे दिसते. कर्मचारीही गायब? सिंहस्थासाठी मोठ्या प्रमाणावर भरती झाल्यानंतरही बाहेरून आलेले कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम सोडून गेल्याने जुन्या कर्मचाऱ्यांवर आहे तो कामाचा ताण कायम असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे कर्मचारी भरताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. स्थानिक कर्मचारी काम सोडून जात नाहीत म्हणून त्यांची भरती करण्याची मागणी होत आहे. सिंहस्थात हा ताण आणखी वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.