शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘मिनी थिएटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:54 IST

रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्य करण्यात येणार आहे. बसस्थानकांमध्ये खासगीकरणातून मिनी थिएटर उभारण्याला महामंडळाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देकायापालट : खासगीकरणातून होणार बसस्थानकांचा विकास; निविदाही मागविल्या

नाशिक : रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्य करण्यात येणार आहे. बसस्थानकांमध्ये खासगीकरणातून मिनी थिएटर उभारण्याला महामंडळाने मंजुरी दिली आहे.राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात नव्या बसेस दाखल करून प्रवाशांना एस.टी.कडे वळविल्यानंतर आता बसस्थानकांचे स्वरूप पालटण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. राज्यातील बसस्थानकांचा खासगीकरणातून विकास करताना प्रवाशांना अधिक आरामदायक सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यामध्ये फुडपार्क, करमणूक, चिल्ड्रेन स्टॉल, हस्तकला स्टॉल, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह आदी सुविधा आधुनिक बसस्थानकांमध्ये करण्यात येणार आहे.खासगीकरणातून बसस्थानकांचा कायापालट करण्याचा पहिला प्रयोग नाशिकमधून सुरू झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमधील मेळा बसस्थानकात आधुनिक बसपोर्ट आणि मिनी थिएटर उपक्रमाचे उद्घाटन झाले आहे. आता राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर अशा प्रकारचे मिनी थिएटर आणि फुडपार्क तयार करण्यात येणार आहे. यासाठीची निविदादेखील काढण्यात आली आहे.ज्या बसस्थानकांमधून मुख्य शहरांसाठी गाड्यांची प्रवासी वाहतूक केली जाते आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानके आहेत अशाच बसस्थानकांवर मिनी थिएटर होणार असून, खासगीकरणातून उभे राहणारे थिएटर बीओटी तत्त्वावर चालविले जाणार आहे. परंतु नियंत्रण मात्र महामंडळाचेच असणार आहे.राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात शिवशाही या आरामदायी गाड्या आणल्यानंतर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. महामंडळ आणखी गाड्या विकत घेणार असून, खासगीतूनही अनेक गाड्या महामंडळ चालविण्यासाठी घेणार आहे.मेळास्थानकातील काम संथगतीनेनाशिकमध्ये असलेल्या जुन्या मेळा बसस्थानकाचा विकास करून या जागेवर अत्याधुनिक बसपोर्ट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सुरुवातील महापालिकेने लादलेल्या करामुळे कामकाजास विलंब झाला होता. यातून तोडगा निघाल्यानंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. नाशिक शहरातील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मेळास्थानकाबरोबरच लवकरच महामार्ग बसस्थानकाचेदेखील सुशोभिकरण करून अद्ययावत स्थानक करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ