सटाणा आगारातून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बस फेऱ्या सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:34 PM2021-05-29T19:34:12+5:302021-05-29T19:43:45+5:30

सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यांनी दिली.

Bus services for government employees started from Satana depot | सटाणा आगारातून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बस फेऱ्या सुरु

सटाणा आगारातून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बस फेऱ्या सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देएकावेळी बसमधुन केवळ २२ प्रवाश्यांना प्रवास

सटाणा : लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार सटाणा आगारातून अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकसाठी तीन फेऱ्या शनिवार (दि.२९) पासून सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख उमेश बिरारी यांनी दिली.

रा. प. सटाणा आगारातुन नाशिकमार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशी उपलब्धतेनुसार बसेस सुरु करण्यात येणार आहेत. सटाणा आगारामार्फत नाशिक जाणेसाठी सटाणा येथुन ०८.००, ०२.००, ५.३० व नाशिकहुन ०८.००, ११.१५, ०५.३० ह्या वेळेवर बसेस वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशी उपलब्ध झाल्यास बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख उमेश बिरारी यांनी सांगितले. सदर बसेस पुरवितांना प्रवाश्यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार बसेस संपुर्णतः निर्जंतुकीकरण करुन मार्गावर देण्यात येणार असल्याचेही बिरारी यांनी म्हटले आहे.
प्रवाश्यांनी सार्वजनीक वाहतुकीचा वापर करतांना शासन निर्देशाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. प्रवासादरम्यान तोंडाला मास्क बांधणे व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक असणार आहे. एका आसनावर केवळ एकच प्रवाशी बसुन प्रवास करु शकतो व आसनव्यवस्थेत झिकझंग (नागमोडी) पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

शासन निर्देशानुसार एकावेळी बसमधुन केवळ २२ प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी असल्याने प्रवाश्यांनी मार्गावर वाहकांस सहकार्य करण्याचे आवाहन आगार प्रमुख बिरारी यांनी केलेले आहे.
सदरची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय तपासणी किंवा वैद्यकीय कामासाठी जाणाऱ्या प्रवासी व सोबत असणाऱ्या एका व्यक्तीस मुभा असणार आहे. प्रवाशांना आवश्यकतेनुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने प्रवाश्यांनी एस. टी. प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन बिरारी यांनी केले आहे.

Web Title: Bus services for government employees started from Satana depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.