शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

नाशिकरोड बसस्थानकातील  बस पास खिडकी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:28 IST

नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. उपनगर बस पास केंद्र बंद करण्यात आल्याने तेथील २२०० हून अधिक बस पासचा भार नाशिकरोड बस पास केंद्रावर पडला असून, पूर्वीप्रमाणेच पासधारकांसाठी असलेल्या तीन खिडक्या सुरू कराव्यात, अशी मागणी पासधारकांनी केली आहे.  नाशिकरोड बसस्थानकातून मासिक, त्रैमासिक, विद्यार्थी सवलत व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास दिले जातात. जवळपास ६ हजार ५०० पासधारक पास घेतात. नाशिकरोडसह नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी शहराच्या विविध भागात जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकाच्या पास केंद्रातून पास घेतात.एक खिडकी बंद झाल्याने गैरसोयशाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे मे महिन्यात एसटी महामंडळ प्रशासनाकडून सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत असलेली पासधारकांची एक खिडकी बंद करण्यात आली असून, ती अद्यापपर्यंत पूर्ववत चालू करण्यात आलेली नाही. यामुळे मनमाड, इगतपुरी, लासलगाव आदी ठिकाणांहून रेल्वेने नाशिकरोडला येणारे कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी गैरसोय होत आहे. ज्या विद्यार्थी, कामगारांना सकाळी ८ वाजेपर्यंत शाळा, महाविद्यालय अथवा कंपनीत दाखल व्हायचे आहे त्यांना पास केंद्राची खिडकीच आठ वाजता उघडत असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.नाशिकरोडचा झालेला विस्तार व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, प्रवासी यांची संख्या व त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन नाशिकरोड बसस्थानकातील पास केंद्राच्या तीनही खिडक्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पासधारक विद्यार्थी, कामगारांनी केली आहे. याबाबत पंचवटी डेपो व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ, वाहतूक निरीक्षक एस. एच. काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.उपनगर बस पास केंद्र बंदउपनगर सिग्नलजवळ असलेले उपनगर बस पास केंद्र गेल्या नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले असून, तेथील २२०० पासचा बोजा नाशिकरोड बस पास केंद्रावर पडला आहे. त्यातच तीनपैकी एक खिडकी बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवरदेखील कामाचा ताण पडला असून, विद्यार्थी, कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. काठे गल्ली, बोधलेनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, उपनगर आदी आजूबाजूच्या भागातील विद्यार्थी व कामगारांची उपनगर बस पास केंद्र बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे.नाशिकरोड बसस्थानकात पासधारकांसाठी सुरू होणारी पहिली खिडकी सकाळी ७ वाजता उघडून दुपारी ३ वाजता बंद होते. दुसरी खिडकी सकाळी ८ वाजता उघडून दुपारी ४ वाजता बंद होते, तर तिसरी खिडकी सकाळी १० वाजता उघडून सायंकाळी ६ वाजता बंद होत होती. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पासधारकांसाठी असलेले हे वेळापत्रक अत्यंत सोयीचे होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ