बसचालक, वाहकाची दादागिरी; टॅक्टरचालक शेतकऱ्यास मारहाण
By Admin | Updated: February 1, 2017 23:03 IST2017-02-01T23:03:08+5:302017-02-01T23:03:22+5:30
मनमाड : प्रवाशीवर्गाकडून तीव्र नाराजी

बसचालक, वाहकाची दादागिरी; टॅक्टरचालक शेतकऱ्यास मारहाण
मनमाड : एस.टी. बसला ट्रॅक्टरचा धक्का लागून आरसा फुटल्याचा राग आल्याने टॅक्टरचालकावर अरेरावी करून मारहाण करणाऱ्या बसचालक व वाहकाला अखेर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून देण्याची नामुष्की ओढावली. या प्रकारात एस.टी. बसमधील प्रवाशांना मात्र तासभर रखडावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी दुपारी सकल मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन आटोपल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होत असतानाच शिर्डीकडे जाणारी मनमाड आगाराची बस (क्र. एमएच ४० वाय ५६६४) पाकिजा कॉर्नरजवळून जात असताना एफसीआय रोडवरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने बसचा आरसा फुटला. बसचालकाने बस उभी करून त्या ट्रॅक्टरचालकाला अडवून नुकसानभरपाई देण्यासाठी
मारहाण करत अरेरावी केली. यावेळी जमा झालेल्या नागरिकांनी बसचालक व वाहकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत चालक व वाहकास पोलीस स्थानकात आणले. (वार्ताहर)