शिंगाडा तलाव येथे बसवाहकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:57 AM2021-02-08T00:57:24+5:302021-02-08T00:57:43+5:30

शिंगाडा तलाव येथे एका युवकाने राज्य परिवहन महामंडळाची धावती बस रोखून बसवाहकाला शिवीगाळ करत खाली खेचत मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. 

Bus driver beaten at Shingada Lake | शिंगाडा तलाव येथे बसवाहकाला मारहाण

शिंगाडा तलाव येथे बसवाहकाला मारहाण

Next
ठळक मुद्देकट मारल्याचे कारण : संशयित ताब्यात

नाशिक : शिंगाडा तलाव येथे एका युवकाने राज्य परिवहन महामंडळाची धावती बस रोखून बसवाहकाला शिवीगाळ करत खाली खेचत मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. 
याप्रकरणी फिर्यादी अंकुश जामवंतराव काळे (३४, रा. ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित मोहंमद शोएब निसार शेख (२२, रा. भद्रकाली) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेखविरुध्द गुन्हा दाखल केला 
आहे. 
शनिवारी (दि.६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास काळे हे बसमधून ( एमएच २० बीएल १५४६) शहाद्याहून नाशिकला येत होते. त्यावेळी शिंगाडा तलावाजवळील रस्त्यावर संशयित शोएब  याने त्यांची बस अडवून अंकुश यांना खाली खेचले. 
तसेच गाडीला कट का मारला, अशी कुरापत काढून मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title: Bus driver beaten at Shingada Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.