शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बस-रिक्षा अपघातात 21 जणांचा मृत्यू; 'ही' आहेत मृतांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 23:25 IST

दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक

देवळा (नाशिक): कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बस कळवण आगाराची होती. बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांची मेशी फाट्याजवळील वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. एसटी बस कळवणच्या दिशेनं, तर रिक्षा मालेगावच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. दोन्ही वाहनांच्या चालकांना वेग नियंत्रणात अपयश आल्यानं ही दुर्घटना घडली. या धडकेनंतर बसनं रिक्षाला फरफटत नेलं. यानंतर दोन्ही वाहनं विहिरीत पडली. विहिरीत रिक्षावर बस पडल्यानं रिक्षामधील सात ते आठ प्रवाशांचा प्रवास मृत्यू झाल्याचं समजतं. याशिवाय बसमधील काही प्रवाशांवरदेखील काळानं घाला घातला आहे. यामध्ये चालकाचादेखील समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक तातडीनं घटनास्थळी रवाना झाले. नाशिकहून जिल्हा रुग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या. विहिरीत पडलेली बस काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र अद्याप दोन जण बेपत्ता आहेत. सध्या शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. थोड्याच वेळात ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. एसटी बसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र एसटी प्रशासनाकडून याबद्दलची माहिती देण्यात येईल, असं घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं-१. अलका धोंडीराम मोरे (खर्डी)२. चंद्रभागा मांगू अुगले (सटवाईवाडी)३. कृष्णाजी संपत निकम (वारवारवाडी)४. रिद्धी योगेश वनसे (जिंबायती)५. शिवाजी रुपल गावीत (नाळीद, कळवण)६. अन्सार अब्दुल अहमद मन्सुरी (सटाणा)७. अंजना शिवराम झाडे (दोडी)८. बाळासाहेब निकम (शिरसमणी)९. शाहिस्ता शकील मन्सुरी (नांदगाव)१०. प्रकाश बच्छाव, चालक (भेंडी)११. रघुनाथ पांडुरुंग मेतकर (देवळा)१२. अजिज नथ्थू मन्सुरी (येसगाव)

---

 

टॅग्स :Accidentअपघात