भुपाळ्यांच्या सुरांनी उगवते पहाट

By Admin | Updated: November 11, 2015 23:01 IST2015-11-11T22:58:35+5:302015-11-11T23:01:02+5:30

सिन्नर : शहरातील विविध मंदिरांमध्ये काकड आरतीचा गजर

The burst of gems grow in the morning | भुपाळ्यांच्या सुरांनी उगवते पहाट

भुपाळ्यांच्या सुरांनी उगवते पहाट

 सिन्नर : कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत सिन्नर शहरातील विविध मंदिरांमध्ये भजनी मंडळांच्या वतीने काकड आरती करण्यात येत आहे. पहाटेच्या कर्णमधुर सुरांनी नटलेल्या भुपाळ्यांसह काकड आरती व भजनांनी नागरिक मंत्रमुग्ध होत आहेत. त्यामुळे सिन्नरकरांची पहाट आता मंगलमय सुरांनी उजाडते आहे.
येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात त्र्यंबकबाबा भगत यांच्या नेतृत्वाखाली चिंतामण भगत, श्रीरंग कवाडकर, विलास भगत, राजेंद्र रेवगडे, बाळासाहेब रेवगडे, महावीर परदेशी, पुरुषोत्तम गुजराथी, विलास कर्पे, चंद्रकांत इंगोले, ज्ञानेश्वर हांडे, निवृत्ती आव्हाड, अर्जुन गोजरे, आत्माराम लांडगे, दत्तात्रय ढोली, भाऊसाहेब गोजरे, चंदू गायकवाड, वसंत मुत्रक, रंगनाथ वाजे, बाळासाहेब शिंदे, गोरखनाथ घुले, बळीराम कांडेकर, सुनील भगत, जानकीराम कर्पे, मुरलीधर चव्हाण, मु. शं. गोळेसर, रामदास पाचोरे, विलास जाधव, मीना देशमुख, लीलाबाई भगत, शालिनी देशमुख, मालती बोऱ्हाडे, प्रमिला भगत, चंद्रकला निखिल, ललिता भोर, कमलताई खर्डेकर, हिराबाई लहामगे आदि भजनी मंडळाचे गायक, वादक पहाटे पाचपासून मंदिरात दाखल होत असून, सकाळी आठ वाजेपर्यंत सुश्राव्य भजने सादर करीत आहेत.
मुरलीधर मंदिरात प्रकाश इंदूरकर,र् ज्ञानेश्वर भालेराव, राजेंद्र जाधव, राजेंद्र लोखंडे, अनिल सोनवणे, राजाराम रसाळ, रोशन देशमुख, गणपत रसाळ, हरिभाऊ सोनवणे, सुमन काळदाते, पार्वताबाई सोनवणे, शकुंतला लोखंडे, इंदिराबाई देशमुख, ताराबाई सोनवणे, शकुंतला मुत्रक, सोनी सोनवणे, मयूरी मोहिते, अपेक्षा सोनवणे आदि भजनांत सहभागी होत आहेत. नरसिंह मंदिरात माहेश्वरी महिला भजनी मंडळाच्या कौशल्याबाई कासट, वर्षा चांडक, सुनंदा करवा, कलावती करवा, शकुंतला नावंदर, किरण नावंदर, शशिकला कासट, शकुंतला कासट, शकुंतला जाजू, आशाबाई जाजू, शांताबाई कलंत्री, कमलाबाई कलंत्री, यमुनाबाई मुंदडा, सुलोचना सोमाणी, विमल राठी, कुसुम डागा, वसंतबाई असावा यांच्यासह महिला काकड आरती, अभिषेक, छप्पन्न भोग, अन्नकोटादि कार्यक्रमांत सहभागी होत आहेत.
गावठा भागातील विठ्ठल मंदिरात गोपनाथ लोणारे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे हर्षद गोळेसर, भागवत लोणारे, रवींद्र काकड, रामभाऊ गोळेसर, रामनाथ लोणारे, वाळू लोणारे, नामदेव लोणारे, पांडुरंग खर्जे, कन्हय्या लोणारे आदि सहभागी होत आहेत.
लोंढे गल्लीतील विठ्ठल मंदिरात किसन भाटजिरे, रामनाथ लोंढे, निवृत्ती लोंढे, किसन गोळेसर, दशरथ लोंढे, रामचंद्र लोंढे, विश्वनाथ रुद्राक्ष, शंकर गाडेकर, संदीप पिंगळे, चांगदेव इंगळे, लीलाबाई जाधव, मुक्ताबाई गोळेसर, रखमाबाई लोंढे, लीलाबाई मिठे, सुमन देशमुख, भीमाबाई बलक, भीमाबाई गवळी, केशव गवळी, रखमाबाई लाड, आशाबाई जाधव आदि पारंपरिक भजने सादर करीत आहेत.
नायगाव वेस भागातील दत्त मंदिरात ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुखदेव कोकाटे, पांडुरंग तिकोणे, जगन्नाथ निचित, गोपाळ पडवळ, दत्तात्रय चोथवे, आप्पा चोथवे, हिराबाई डावरे आदि पारंपरिक भजने सादर करीत आहेत.
कुंभार गल्ली भागातील संत गोरोबाकाका मंदिरात विश्वनाथ क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विष्णुपंत जाधव, किशोर जाधव, शिवाजी जाधव, इंदूबाई क्षीरसागर, सुलोचना हुडे, बिडाबाई क्षत्रिय, सरलाबाई जाधव, लक्ष्मी जाधव, छबू जाधव, श्रीराम जाधव, ज्ञानेश्वर जाधव आदि पारंपरिक भजने सादर करीत आहेत.
विजयनगरमध्ये संत सावता माळी मंदिरात नर्मदाबाई लोया, शोभा कलंत्री, कलका लढ्ढा यांच्यासह महिला सहभागी होत असून, लाल चौकातील महालक्ष्मी मंदिरात शालिनीताई गुजराथी, विनोदिनी गुजराथी, भारती गुजराथी, मालती गुजराथी, माधुरी गुजराथी, अनुराधा गुजराथी, सुरेखा गुजराथी, शकुंतला गुजराथी, सुनीता कोरडे, शोभा गुजराथी, रोहिणी गुजराथी, सुशीला गंगावणे, आशाताई गुजराथी, शोभा गुजराथी, श्रीपाद कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी, मीराबाई कुलकर्णी आदिंसह महिला भजने सादर करीत आहेत. शिंपी देवी मंदिरात सुशीलाबाई शिंदे, सिंधूबाई गणोरे, निर्मला अवसरकर, वैशाली खर्डे, मेधा बेदडे, माधवी खर्डे, छाया अवसरकर, संगीता चांडोले, रवींद्र अवसरकर, अक्षय गायकवाड, शुभम पवार यांनी काकडा भजने सुरू केली
आहेत. (वार्ताहर)

Web Title: The burst of gems grow in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.